फक्त मुलांच्या शिक्षणासाठी! कोरोना काळातही जीव धोक्यात घालून भाजी व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

- कोरोना काळातही जीव धोक्यात घालून चिकाटीने केला भाजी व्यवसाय 

खळद : घरी दोन अडीच एकर शेती, पाण्याची शाश्वत सोय नाही. मात्र, आपल्या नशिबाला आलेली गरीबीची झळ मुलांना बसू द्यायची नाही, या जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शिवरी (ता.पुरंदर) येथील शहाजी कामथे व सुषमा कामथे या दाम्पत्याने कोरोनाची परिस्थिती असतानाही सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करत आपला जीव धोक्यात घालीत भाजी विकण्याचा व्यवसाय केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरची जरी हालाखीची परिस्थिती असली तरीही हे दाम्पत्य आपल्या तीन मुलांना एका खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवीत आहेत. याठिकाणी वर्षाकाठी त्यांना जवळपास दोन लाखापर्यंत खर्च येत आहे. आपल्या परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, म्हणून गेले कित्येक दिवस हे दांपत्य सासवड जेजुरी पालखी महामार्गालगत खळद येथे कादबानेमळा वस्तीवरती भाजी विकण्याचा व्यवसाय करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाले. अशावेळी त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र, या परिस्थितीवरही त्यांनी मात करीत वेळोवेळी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत आपला व्यवसाय केला. या काळात कोणीही रस्त्यावर भाजी विकण्याचे धाडस करीत नव्हते, अशा वेळी सासवड, जेजुरी, पुण्यापासून वेगवेगळे नागरिक, शासकीय कर्मचारी, अधिकारी आमच्याकडून भाजी घेऊन जात होते. आमच्या धैर्याचे कौतुक करीत आम्हाला आधार देत काळजी घेण्याचे आवाहनही करीत होते, असे सुषमा कामथे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गरीबांसाठी ऑनलाईन काय कामाचे...

आम्ही रात्रदिवस कष्ट करून मुलांचे शिक्षण करीत आहे, शाळा बंद असल्याने ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत व यासाठी मुलांच्याकडे मोबाईल असणे गरजेचे आहे. मात्र, मला तीन मुलांसाठी तीन स्वतंत्र मोबाईल घेणे शक्य नसल्यामुळे एकाच मोबाईलवर हे क्लास चालू आहेत व यामुळे तीनही मुले एक एक दिवस क्लास करतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील दोन दिवस इच्छा असतानाही त्यांना क्लास करता येत नाही तरी शासनाने माझ्यासारख्या अशा अनेक पालकांच्या अडचणींचा विचार करता आता ऑनलाइन दिले जाणारे शिक्षण ज्यावेळेस शाळा सुरू होईल. त्यावेळेस पुन्हा द्यावे जेणेकरून आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी अपेक्षा शहाजी कामथे यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple sell vegetables in Corona Situation for Children Education in Pune