
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घेण्याचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला.