पुण्यात न्यायालयीन कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

न्यायालयातील कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये सुरू राहणार आहेत. त्यामुळे कामकाजाची वेळ वाढविण्याबाबत मागणी करणाऱ्या पक्षकारांना आणि वकील वर्गाला आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे न्यायालयातील कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये सुरू राहणार आहेत. त्यामुळे कामकाजाची वेळ वाढविण्याबाबत मागणी करणाऱ्या पक्षकारांना आणि वकील वर्गाला आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनलॉक सुरू झाल्यापासून न्यायालयातील कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरू आहे. त्यामुळे सुनावली थंडावली आहे. तर वकिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजाची वेळ आणि न्यायाधीशांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशन करण्यात आली होती. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालय आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना असोसिएशनतर्फे पत्र पाठवण्यात आले होते. त्यामुळे या महिन्यात न्यायालयातील कामकाज पूर्णवेळ सुरू होईल, अशी आशा वकिलांना होती. मात्र या महिन्यात देखील 15 तारखेपर्यंत एकाच शिफ्टमध्ये कामकाज सुरू राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले की, न्यायालय सुरू करण्याबाबत जिल्ह्यातील वकिलांनी आपले मते नोंदवली आहेत. त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला पाठवण्यात आला असून उच्च न्यायालयाने त्याबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीला दिली आहे. त्यावर विचार करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे 15 सप्टेंबरनंतर ही परिस्थिती बदलू शकते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायालयात सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी सुरू आहे. मात्र आवाज न येणे, इंटरनेटमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे युक्तिवाद करताना अडचणी येत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court proceedings in Pune in a single shift till September 15