family court
sakal
पुणे - पत्नी उच्चशिक्षित असून, एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरी करत आहे, असे नमूद करत पत्नीचा पोटगीचा दावा नाकारण्याबरोबरच घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली आहे. मुलाच्या संगोपनासाठी वडिलांनी हातभार लावला पाहिजे, असा निर्णय देत त्यांना दरमहा दहा हजार रुपये देण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.