
पुणे : लग्नानंतर एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. घटस्फोटसाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश बी. डी. कदम यांनी फेटाळला आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम १४ नुसार विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोटासाठी दावा दाखल करता येत नाही. ही बाब पत्नीच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सुनावणी सुरू करण्यापूर्वीच न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळला.