Chakan Crime : चुलत भावाने दिली भावाच्या हत्येची सुपारी; कंपनीच्या व्यवस्थापकावर गोळीबार करणाऱ्या दोघां आरोपींना अटक

चाकण, ता. खेड गावच्या औद्योगिक वसाहतीतील वराळे, ता. खेड गावच्या हद्दीतील कैलास स्टील या कंपनीच्या व्यवस्थापकावर वीस जानेवारीला दोघांनी गोळीबार केला होता.
Chakan Crime
Chakan Crimesakal
Updated on

चाकण - चाकण, ता. खेड गावच्या औद्योगिक वसाहतीतील वराळे, ता. खेड गावच्या हद्दीतील कैलास स्टील या कंपनीच्या व्यवस्थापकावर वीस जानेवारीला सकाळी पावणे अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात अजय विक्रम सिंग (वय- 35 वर्ष, रा. हिंजवडी) हा जखमी झाला होता.

याप्रकरणी आरोपी अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम उर्फचंदन अनंत सिंग (वय -42 वर्ष, रा. मारुंजी, पुणे) याच्याकडे तपास केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. गोळीबार प्रकरणी आरोपी रोहित सुधन पांडे (वय- 23 वर्ष, रा. दुबहड, बडसर, बलिया, उत्तर प्रदेश) याला उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या गोळीबार प्रकरणी हत्येची सुपारी देणाऱ्या चुलत भावासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय सिंग हे कंपनीत असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला होता. त्यात ते जखमी झाले होते. अजय सिंग ला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. आरोपी दुचाकीवरून फरारी झाले होते.

त्यानंतर पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी आदेश केल्यानंतर सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. या प्रकरणाचा तपास होण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप व गुंडाविरोधी पथकातील अंमलदार यांनी घटना स्थळावरील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. पोलीस हवालदार श्याम बाबा व मेदगे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून फिर्यादी यांचा चुलत भाऊ संग्राम सिंग याच्याकडे तपास केला. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

संग्रामसिंग याने त्याच्या ओळखीच्या चार कामगारांना बारा लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. संग्रामसिंग याने चार कामगार यांना अजय सिंग यांचा फोटो, कैलास स्टील कंपनीचा पत्ता, गुगल लोकेशन व अजय सिंग यांचे येण्या -जाण्याचे टायमिंग दिले होते. आरोपीनी घटनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर वेगवेगळ्या गाड्या मधून येऊन रेकी केली होती व अजय सिंगला मारण्याचा प्लॅन केला होता.

या गुन्ह्याप्रकरणी आरोपी संग्राम सिंग याला खेड न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी रोहित पांडे याला उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी संग्राम उर्फचंदन आनंत सिंग याच्यावर गुजरात राज्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस पथके प्रयत्न करत आहेत.

पिंपरी- चिंचवड चे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, सहाय्यक पोलीस फौजदार पी. पी. तापकीर, एस. एन. ठोकळ, सहाय्यक पोलिस फौजदार व्ही. एच. जगदाळे, सहाय्यक पोलीस फौजदार ए. पी. गायकवाड, पोलीस हवालदार जी. डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही. टी. गंभीरे, जी. एस. मेदगे, एस. पी. बाबा, एन. बी. गेंगजे, व्ही. डी. तेलेवार, पोलीस शिपाई व्ही. एन. वेळापुरे, आर. के. मोहिते, एस. टी. कदम, टी. ई. शेख यांनी केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com