पुणे - घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात सदनिकेच्या बाल्कनीतून ढकलून दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना धायरी गावात शनिवारी (ता. १५) आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
अमर किसन देशमुख असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मोहपत हरिराम साहारे (वय-३६, रा. मतनेगर, धायरी गाव) यांनी रविवारी फिर्याद दिली. त्यानुसार राजा भुरेलाल देशमुख (रा. मतनेगर, धायरी गाव) याच्यावर नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजा देशमुख आणि त्याचा चुलतभाऊ अमर देशमुख यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले. अमर हा मारण्यासाठी राजा देशमुख याच्या अंगावर धावून गेला.
त्यावेळी राजाने अमर देशमुख यास ढकलून दिल्याने तो बाल्कनीतून खाली पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने अमर देशमुख याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) गुरूदत्त मोरे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.