पुणे : हवेलीत रुग्णांची संख्या पोहोचली 170 वर...

जनार्दन दांडगे
बुधवार, 1 जुलै 2020

- हवेलीत मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 36 नवे रुग्ण.

- ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 170 वर.

लोणी काळभोर : हवेली तालुक्यात मंगळवारी (ता. ३०) दिवसभरात कोरोनाचे 36 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. खानापूर ग्रामपंचायत हद्दीत एकाच दिवसात 9 तर मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत 4 रुग्ण आढळून आले. या 36 रुग्णांमुळे मागील सात दिवसांच्या काळात हवेलीमधील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हवेलीमधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा विचार केल्यास, पन्नास टक्क्याहुन अधिक मांजरी बुद्रुक, खानापुर, कुंजीरवाडी या तीन गावातच आहेत. हवेलीमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हवेली पंचायत समिती व हवेलीचा आरोग्य विभाग यांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेलीत खानापुर (नऊ), मांजरी बुद्रुक (चार), नर्हे (चार), किरकटवाडी (तिन), उरुळी कांचन (एक). सोरतापवाडी (एक), कुंजीरवाडी (एक), 
गुजर-निंबाळकरवाडी (एक), खेडशिवापुर (एक), 
खानापुर (एक), घेरासिंहगड (एक), शेवाळेवाडी (एक), वडकी (एक), हांडेवाडी (एक), कदमवाकवस्ती (एक), 
न्यु कोपरे (एक), कोंढवे धावडे (एक), खडकवलासला (एक), व नांदेड (दोन) वरील ग्रामपंचायत हद्दीत छत्तीस रुग्ण आढळुन आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले,  हवेली तालुक्यातील खानापुर, मांजरी बुद्रुकसह 19 गावात मिळून मंगळवारी दिवसभरात तब्बल 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हवेली तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे. तर मंगळवारी दिसभरात उपचारानंतर सहा रुग्णांना घरी सोडले आहे. तालुक्यात मागील साडेतीन महिन्याच्या काळात 370 रुग्ण आढळून आले आहेत. यात मागील सात दिवसातील 170 रुग्णांचाही समावेश आहे. तर तालुक्यातील रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सध्या अकरा दिवसावर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. सचिन खरात म्हणाले, हवेली तालुका पुणे शहराला लागून असल्याने, शहरातून कामानिमित्त ये-जा अधिक आहे. त्याचाच फटका रुग्ण वाढीला बसला आहे. यातूनही मार्ग काढण्यासाठी आरोग्य विभाग व पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. घराबाहेर पडताना शंभर टक्के नागरिकांनी मास्कचा वापर करावा, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याबरोबरच, दंडही वसूल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येत असलेल्या नागरिकांची शोध मोहीम हाती घेतली असून, कोरोनाची साखळी तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID 19 infected patients numbers Increasing in Haveli Pune