esakal | पुणेकरांनो सावधान! ‘व्हेंटिलेटर’ बेड शिल्लकच नाहीत; दिवसभरात वाढलेत 12 हजार रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 test pune

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बेडची नोंदणी आणि माहिती देण्यासाठीच्या हेल्पलाइनचा विस्तार केला आहे. त्यातून लोकांसाठी १५ दूरध्वनी उपलब्ध केले आहेत.

पुणेकरांनो सावधान! ‘व्हेंटिलेटर’ बेड शिल्लकच नाहीत; दिवसभरात वाढलेत 12 हजार रुग्ण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - पुणे जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये 12 हजार 90 रुग्ण सापडले आहेत. त्यात पुणे शहरातील 7 हजार 10 रुग्ण आहेत. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 89 हजार 598 इतकी आहे. यातील 21 हजारांहून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 68 हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे होम क्वारंटाइन आहेत. दरम्यान, एकीकडे पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना व्हेंटिलेटर बेडच शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे.  नव्या कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी सुमारे साडेसात हजार बेड असल्या तरी; त्यात एकही ‘व्हेंटिलेटर’ बेड शिल्लक नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीच गुरुवारी स्पष्ट केले. 

पुढच्या कही दिवसांत ५० व्हेंटिलेटर बेड तयार होतील. तर एकूण ८ हजार बेड वाढविण्याचे नियोजन आहे, असेही कुमार यांनी सांगितले. विक्रम कुमार म्हणाले, ‘‘शहरात गेल्या ५० दिवसांत ४५ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ३९ हजार रुग्ण घरी आहे. तर साडेसहा हजार रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील ४ हजार रुग्णांना ऑक्सिजन आणि ५५० जण ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. विविध रुग्णालयांत चारशे ऑक्सिजन बेड शिल्लक असून, रोज ५ ते १० ‘व्हेंटिलेटर’ उपलब्ध केले जात आहेत. सध्या कोरोनाच्या संसर्गाचा दर हा २७ टक्क्यांपर्यंत आहे.’’

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोना काळात गेल्या वर्षी विविध रुग्णालयांत ७ हजार २०० बेड महापालिकेच्या ताब्यात होते. आजघडीला सध्या ७ हजार ४०० बेड असून, ही संख्या ८ हजार ३०० पर्यंत वाढविण्याचे नियोजन केले आहे. बिबवेवाडी येथील ‘ईएसआय’चे १३० बेडचे रुग्णालय डॉक्टरसह ताब्यात घेण्यात येत आहे. लष्कराच्या रुग्णालयातूनही २० व्हेंटिलेटर आणि २० ‘एचडीओ’ बेड येत्या आठ दिवसांत मिळतील.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका पुणे

हे वाचा - नऱ्हे येथे कोविड सेंटर आजपासून सुरू; वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

हेल्पलाइनचा विस्तार
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बेडची नोंदणी आणि माहिती देण्यासाठीच्या हेल्पलाइनचा विस्तार केला आहे. त्यातून लोकांसाठी १५ दूरध्वनी उपलब्ध केले आहेत. हेल्पलाइनसाठी खासगी एजन्सीकडून मनुष्यबळ घेण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकांना अडचणी येणार नाहीत, असेही सांगण्यात आले.
 

loading image
go to top