esakal | पुणे : कोणाच्याही संपर्कात नाही तरीही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19_India

पुणे-मुंबईचा अथवा अन्य रुग्णांचा संपर्क नसताना ते पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पुणे : कोणाच्याही संपर्कात नाही तरीही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमेश्वरनगर : निंबुतनजीक कण्हेरवाडी (ता. बारामती) येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परिसरात यानिमित्ताने काठाकाठावर खेळणाऱ्या कोरोनाचा पहिलाच शिरकाव झाला आहे. पुणे-मुंबईचा अथवा अन्य रुग्णांचा संपर्क नसताना ते पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कण्हेरवाडी येथील सदर व्यक्तीने आजारी असल्याने नीरा येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. बरे न वाटल्याने लोणंद येथील रुग्णालयात गेले. त्यावेळी न्यूमोनिया असल्याचे निदान झाले. त्यानंतर शंका काढण्यासाठी काल बारामतीत कोरोना चाचणी केली. आज तो अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

दरम्यान, सदर व्यक्ती आजारानंतर कोणाच्याही संपर्कात नाही अथवा घर सोडले नाही. त्यामुळे धोका कमी आहे. परंतु तरीही परिसरात काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांचा मुलगा, सून व नातू यांचीही चाचणी करून घेणार असल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेने कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यापूर्वी मुरूम येथील पुरुष पॉझिटिव्ह होता. परंतु पुण्यात राहणार असल्याने चारच दिवस मुरूमला आला होता. त्यावर पुण्यात उपचार झाले. खंडोबाचीवाडी येथील व्यक्ती भोरला सरकारी सेवेत होती. तेही भोरमध्ये पॉझिटिव्ह निघाले. ते दोघेही बरे झाले आहेत. तर वाणेवाडी येथील महिला पॉझिटिव्ह आली होती. मात्र, ती हडपसर येथेच राहत होती.