esakal | खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही कामाच्या ठिकाणी मिळणार लस
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 vaccination

पुण्यातील २५ खासगी कंपन्यांनी त्यांच्या सुमारे १२ हजार कर्मचाऱयांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी करण्यासाठी महापालिकेचे सहकार्य मागितले आहे.

खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही कामाच्या ठिकाणी मिळणार लस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास परवानगी देण्यास केंद्र सरकारने बुधवारी अखेर मंजुरी दिली. या बाबतचे आदेश राज्य सरकारला आले आहेत. पुण्यातील २५ खासगी कंपन्यांनी त्यांच्या सुमारे १२ हजार कर्मचाऱयांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी करण्यासाठी महापालिकेचे सहकार्य मागितले आहे. शासकीय कंपन्यांसाठीही केंद्र सरकारने हा आदेश लागू केला आहे. 

४५ वर्षांवरील कामगार, अधिकाऱयांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी करण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशी मागणी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरचे  (एमसीसीआयए) अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने यांनी जिल्हाधिकारी, महापालिका यांच्याकडे केली होती. देशातील अनेक औद्योगिक संघटनांनीही या बाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी सर्व राज्यांसाठी आदेश लागू केला. त्यात कामाच्या ठिकाणी ११ एप्रिलपासून लसीकरण सुरू करण्यात यावे, असे म्हटले आहे. तसेच त्यासाठी कशी तयारी करायची, या बाबतची मार्गदर्शक तत्त्वेही पाठविली आहेत. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हे वाचा - पुण्यात ग्रामीण भागात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पुणे आणि परिसरातील सुमारे २५ कंपन्यांनी ‘एमसीसीआयए’मार्फत जिल्हा प्रशासनाकडे या बाबत या पूर्वीच संपर्क साधला आहे. त्यांच्या १२ हजार कर्मचाऱयांचे लसीकरण कंपनीतच झाल्यास महापालिका किंवा स्थानिक प्रसासनावरील ताण कमी होईल. तसेच लसीकरणासाठी डॉक्टर व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचीही तयारी या कंपन्यांनी या पूर्वीच दर्शविली आहे. मात्र, केंद्र सरकारने आदेश दिल्यामुळे आता शहर आणि परिसराती सुमारे २०० हून अधिक कंपन्यांमधील कामगारांचे लसीकरण होऊ शकते. दरम्यान, या बाबत ‘एमसीसीआयए़ने दोन्ही महापालिकांशी बुधवारी सायंकाळी चर्चा केली. गुरुवारी या बाबत बैठक घेऊन आराखडा निश्चित करण्यात येईल, असे ठरल्याची माहिती गिरबने यांनी दिली.

loading image