भिगवणला कोविड केअर सेंटर सुरु करणार : दत्तात्रय भरणे

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

इंदापुर तालुक्यातील भिगवण व परिसरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे.

भिगवण : इंदापुर तालुक्यातील भिगवण व परिसरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेऊन तयारीचा आढावा 
घेतला. 

येथील ट्रॉमा केअरच्या इमारतीमध्ये आयोजित आढावा बैठकीसाठी तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.रोहन कुंभार, जिल्हा परिषद सदस्य 
हनुमंत बंडगर, प्रताप  पाटील, आबासाहेब देवकाते, संतोष धवडे, सचिन बोगावत,विजयकुमार गायकवाड, संदीप वाकसे, प्रशांत शेलार, अजिंक्य माडगे, महेश शेंडगे, बापूराव थोरात, अमोल देवकाते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, भिगवण परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करणार आहे. येथील सुविधांचा आढावा घेण्यात असुन येत्या आठवडयात हे सेंटर कार्यान्वित होईल. या ठिकाणी रुग्नांच्या उपचारासह स्वॅब घेण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

भरणे म्हणाले, ''इंदापुर तालुक्यातील कोरोनावर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणुन सतत लक्ष आहे. कोरोनाच्या काळात तालुक्यातील जनतेला सुविधा देण्यासाठी अत्यावश्यक बाबींचे किट वाटप, रक्तदान तसेच उपचारांच्या ठिकठिकाणी सुविधा देण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य 
काळजी घ्यावी. भिगवण येथे कोविड केअर सेंटर सुरु करावे अशी नागरिकांची मागणी होती. कोविड केअर सुरु करण्याच्या हालचालींस वेग आल्यामुळे व आठवडाभरात हे सेंटर सुरु होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Care Center to be started in Bhigwan says Dattatraya