esakal | बारामतीत लोकसहभागातून 100 रुग्ण क्षमतेचे कोविड केअर सेंटर 
sakal

बोलून बातमी शोधा

baramti

बारामती शहरातील लोकसहभागातून सुरू केलेल्या पहिल्या कोविड केअर सेंटरचा प्रारंभ काल बारामतीत झाला. येथील नटराज नाट्य कला मंडळ बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहामध्ये 100 रुग्ण क्षमतेच्या सेंटरचे संपूर्ण व्यवस्थापन करणार आहे. 

बारामतीत लोकसहभागातून 100 रुग्ण क्षमतेचे कोविड केअर सेंटर 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील लोकसहभागातून सुरू केलेल्या पहिल्या कोविड केअर सेंटरचा प्रारंभ काल बारामतीत झाला. येथील नटराज नाट्य कला मंडळ बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहामध्ये 100 रुग्ण क्षमतेच्या सेंटरचे संपूर्ण व्यवस्थापन करणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रशासनावरील ताण हलका व्हावा व आरोग्य विभागाच्या लोकांना रुग्णांच्या तब्येतीकडे अधिकाधिक लक्ष देता यावे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर सुरु केल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ, नगरसेविका नीता चव्हाण व मयूरी शिंदे आदी उपस्थित होते. 

पुण्यात चार लाख नागरिकांना ई पास

या कोविड सेंटरमध्ये निवास, भोजन, चहा, नाश्ता यासह इतर सुविधा नटराजच्या वतीने विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत. या शिवाय डॉक्टर व परिचारिकांची सेवा, नियमित तपासणी, औषधोपचार अशी कामे आरोग्य विभागाच्या वतीने केली जातील.  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेव्हा या सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करण्याचा निर्णय डॉक्टर घेतील, तेव्हा संबंधित रुग्णाला रुग्णवाहिकेच्या मदतीने सेंटरमध्ये दाखल करण्यापासून ते 14 दिवस त्याला तेथे ठेवण्यासह त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे. 

खडकवासला धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

आवश्यकतेनुसार येथेही रुग्ण हलविले जाऊ शकतात. येथे रुग्णाच्या निवासासोबतच त्याच्या करमणुकीसाठी टीव्ही हॉलचीही सुविधा दिली जाणार आहे. प्रशासनाच्या सहकार्याने प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी करण्याचा प्रयत्न नटराज नाट्य कला मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहेत. स्वागत कक्षापासून ते इतर सर्व प्रकारची जबाबदारी मंडळ स्विकारणार आहे. सध्या रुग्णांची वाढती संख्या व उपलब्ध मनुष्यबळात काम करताना प्रशासनाची कसरत होत आहे, या पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.