लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटर लवकरच होणार सुरु

लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटर लवकरच होणार सुरु

लोणी काळभोर (पुणे)- उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीमधील कोरोना बाधीत रुग्णांच्या सोईसाठी लोणी काळभोर येथे मंगळवारी (ता. १५) सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही परीस्थितीत शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आदेश जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाला रविवारी (ता. १३) सकाळी दिले. 

दरम्यान लोणी काळभोर येथील एमआयटी शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलच्या इमारतीत पहिल्या टप्प्यात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्याने, पुर्व हवेलीमधील रुग्णांची बेडसाठीची धावपळ कांही प्रमानात तरी थांबणार असल्याचा दावा डॉ. आयुष प्रसाद यांनी केला आहे. तर गरज भासल्यास, याच ठिकाणी आनखी तीनशे बेड वाढविण्यात येतील असेही डॉ. आयुष प्रसाद यांनी यावेळी स्पष्ठ केले. 

लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात मागिल दोन महिण्यापासुन चालु असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी जिल्हा परीषदेने निधी देण्यास नकार दिल्याने, विश्वराज हॉस्पिटमधील कोविड केअर सेंटर बंद करण्याची नामुस्की आरोग्य विभागावर तीन दिवसापुर्वी ओढवली होती. विश्वराज हॉस्पिटमधील कोविड केअर सेंटर बंद पडल्याने, पुर्व हवेली नागरीकांची गैरसोय लक्षात घेऊन मदार अशोक पवार यांनी डॉ. आयुश प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग, महसुल विभाग व विश्वराज हॉस्पिटल प्रशासन यांची संयुक्त बैठक लावली होती. यावेळी बैठकीनंतर डॉ. आयुष प्रसाद यांनी शंभर बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. 

यावेळी आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, विश्वराज हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. आदीती कराड, विश्वराज रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. पि. के. देशमुख, हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना डॉ. आयुष प्रसाद म्हणाले, राज्य शासनाकडुन डॉ. रखमाबाई राऊत योजनेस मुदतवाढ न मिळाल्याने, जिल्हा परीषद विश्वराज हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटरसाठी निधी पुरवु शकत नाही. यामुळे वरील सेंटर मागिल तीन दिवसापासुन बंद करण्यात आले होते. मात्र पुर्व हवेलीमधील कोरोना बाधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी एमआयटी शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलच्या इमारतीत तात्काळ शंभर बेडचे सेंटर सुरु करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. वरील सेंटर जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग चालवणार असल्याने, यापुढील काळात सेंट बंद करण्याचा प्रश्नच उभा राहणार नाही. 

बिल थकल्यामुऴे बंद करावे लागले- डॉ. आदीती कराड
दरम्यान कोविड सेंटर बंद करण्याबाबत विश्वराज हॉस्पिटलची भुमिका स्पष्ठ करताना, विश्वराज हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. आदीती कराड म्हणाल्या, दोन महिण्यापुर्वी जिल्हा परीषदेने विनंती केल्यामुळे, एक रुपयाही न घेता मागिल दोन महिण्यापासुन विश्वराज हॉस्पिटलच्या इमारतीत कोविड केअर सेंट चालवले जात होते. या दोन महिण्याच्या काळातील थकलेली बिले देण्यास जिल्हा परीषदेने नकार दिल्याने नाईलाजास्तव कोविड केअर सेंटर बंद करावे लागलेले आहे. मागिल दोन महिण्याच्या काळात नऊशेहुन अधिक रुग्णांच्यावर उपचार केलेले आहेत. विश्वराज हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटर बंद करावे लागले तरी, यापुढील काळात गोरगरीब कोरोना बाधीत रुग्णांच्यासाठी ना नफा-ना तोटा या तत्वानुसार एक ठराविक रक्कम घेऊन उपचार सुरु ठेवण्यात येणार आहेत. नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी विश्वराज रुग्णालय कायम सेवेत राहणार असल्याचेही डॉ. आदीती कराड यांनी यावेळी स्पष्ठ केले. 

सेंटर बंद पडल्यास खपवुन घेणार नाही- आमदार पवार
दरम्यान याबाबत बोलतांना आमदार अशोक पवार म्हणाले, पुर्व हवेलीमधील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पहिल्या टप्प्प्यात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर मंगळवारपासुन एमआयटी शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलच्या इमारतीत तात्काळ सुरु करण्यात येणार आहे. गरज भासल्यास, वरील सेंटरमध्ये आनखी बेड वाढवण्याच्या सुचना आरोग्य विभागाला केलेल्या आहेत. यापुढील काळात कोविड केअर सेंटर बंद पडल्यास अथवा रुग्णांची गैरसोय झाल्यास, अजिबात खपवुन घेतले जाणार नाही. आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com