अरे वा, सासवड- जेजुरीतही उभारणार कोविड हेल्थ सेंटर

Saswad
Saswad

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यात खंड नाही. तसेच, तालुक्यात जेजुरीसह ग्रामीण भागातही संसर्ग वाढत आहे. मात्र, पुण्यातील रुग्णालयात या पुढे जागा मिळणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे सासवड व जेजुरी शहरात कोरोनावर आवश्यक ते उपचार देणाऱ्या कोविड हेल्थ सेंटर (डिसीएचसी) तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सासवड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात 31 खाटांच्या वाॅर्डमध्ये बेडनिहाय आॅक्सीजन पाइप बसवून झाले आहेत. तर, सासवडमधील रुग्णालयाची ओपीडी व आयपीडी या लगतच्या तालुका पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत हलविण्यासाठी आमदार संजय जगताप यांनी जिल्हा शल्य चिकित्सक नांदापूरकर यांना कळविले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची सेवा आणि स्थानिक पातळीवरच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार होतील. याच पद्धतीने जेजुरीत शासकीय रुग्णालयमार्फत  31 बेडसह कोरोनावरील उपचाराची सोय करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

याबाबत आमदार जगताप यांच्या उपस्थितीत प्रशासकीय मंडळींची तातडीची बैठक सासवडला झाली. त्यात कोविड केअर सेंटरची व्याप्ती वाढविणे, कोरोना रुग्णांची स्थानिक पातळीवर व्यवस्था करणे, कटेंनमेंट झोनवर लक्ष ठेवणे, उपाययोजनातून संसर्ग नियंत्रित करणे, आदी बाबींवर नियोजन झाले. तालुका रुग्ण संख्येबाबत दोनशेकडे व एकटे सासवड सेंच्युरी ओलांडून कधीच पुढे गेले आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर हालचाल सुरू आहे. 

यानिमित्त झालेल्या बैठकीस तहसीलदार रुपाली सरनौबत, सासवड पालिका मुख्याधिकारी विनोद जळक, तालुका गट विकास अधिकारी मिलिंद टोणपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, सासवड शहरातील कोविड केअर सेंटरची क्षमता 62 बेडची आहे. त्याशिवाय लगतच्या दिवे गावठाणापासून दूर अजून एक कोविड केअर सेंटरची तयारी सुरु केली आहे. तसेच, कोविड हाॅस्पीटलसाठी तिथेच समाजकल्याणची वसतिगृहाची इमारत ताब्यात घेण्यात आली असून, पुढील तयारी सुरु आहे.

Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com