
पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असून बरे होण्याचे प्रमाण ९४.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकूण २९ हजार ७५७ चाचण्या केल्या, त्यापैकी २ हजार ५०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यापैकी २ हजार ३६५ रुग्ण म्हणजेच ९४.५६ टक्के पूर्णपणे बरे झाले.