
पुणे शहरातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश आढळून आल्याने पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) केलेल्या तपासणीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मे 2025 पासून शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूच्या अंशाचे प्रमाण वाढत असल्याचे निष्कर्ष सादर झाले आहेत. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये सतर्कतेची गरज निर्माण झाली आहे.