
पुणे : राज्य सरकारने नुकतेच जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर केले असले तरी, हा कायदा पूर्णपणे लोकशाहीविरोधी असून तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, असा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) राज्यभर जनजागृती आणि आंदोलनाची मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) प्रदेश सचिव डॉ. अजित नवले आणि पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.