Pune RTO
sakal
पुणे
Pune RTO : बेशिस्त वाहनचालकांना दणका! पुण्यात ‘आरटीओ’कडून ३ हजार ६०० वाहन परवाने निलंबित
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मागील वर्षात ३ हजार ६०० वाहन परवाने निलंबित केले आहेत.
पुणे - सिग्नलचे उल्लंघन करणे, निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे आदी विविध गुन्ह्यांसंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मागील वर्षात ३ हजार ६०० वाहन परवाने निलंबित केले आहेत. ज्या वाहनचालकाचा वाहन परवाना निलंबित झाला आहे, तो चालक वाहन चालविताना आढळल्यास त्याला ५ हजार रुपयांचा दंड केला जाणार असल्याची माहिती पुणे ‘आरटीओ’ने दिली.

