Video : अभिराम घडवतोय अप्रतिम ओरिगामी कलाकृती

ओरिगामी कलेतून तयार केलेला पक्षी दाखविताना अभिराम जोशी.
ओरिगामी कलेतून तयार केलेला पक्षी दाखविताना अभिराम जोशी.
Updated on

ओरिगामी या जपानी कलेच्या माध्यमातून अभिराम जोशी अनेक कलाकृती घडवतो. त्याच्या या अनोख्या सृष्टीत प्राणी, पक्षी, कीटक व फुलं तर असतातच, पण यंत्रमानवही असतो. तो मोठ्या कागदाच्या घड्या घालत जातो, तेव्हा समोरच्याला पटकन्‌ लक्षात येत नाही की, यातून काय साकारणार आहे. जरा वेळातच एखादी सुबक आकृती तयार होते आणि ती बघणारा मग अभिरामचं कौतुक करत राहतो.

अभिराम कागदाच्या घड्या घालत एकाहून एक सुरेख कलाकृती तयार करतो. ओरिगामी या जपानी कलेचा आविष्कार त्याने तीन वर्षांपूर्वी एका उन्हाळी शिबिरात प्रथमच पाहिला. त्याने प्रेरित झालेल्या अभिरामने मग यू ट्यूबच्या माध्यमातून या संदर्भात शोधाशोध सुरू केली. सातोशी कामिया या कलावंताच्या कलाकृती आणि त्या कशा करायच्या, याबाबत असलेल्या मार्गदर्शक चित्रफिती पाहून अभिराम प्रभावित झाला. सलग सात-आठ महिने त्याने झपाटल्याप्रमाणे सराव केला. नवनव्या कलाकृती पाहून त्या आकाराला आणण्याचं तंत्र  चिकाटीने आत्मसात केलं. 

तो म्हणाला, ‘‘ओरिगामी कलेतून मी वेगवेगळ्या आकारातले डबे बनवतो. बाउल तयार करून आईला फुलं ठेवायला देतो. कागदाचे चेंडू आणि भिंगरी बनवून छोट्या मित्रांना खेळायला देतो. त्यांनासुद्धा मजा वाटते. सातोशी यांच्या कलाकृती पाहिल्यावर मलाही त्यांच्यासारखंच व्हावंसं वाटलं. यासाठी खूप मेहनत घेतली. पुण्यातल्या ओरिगामी मित्रमंडळाकडूनही मला काही गोष्टी समजल्या. माझं कौतुक करत त्यांनी मला त्यांच्या ओरिगामी कलाकृती प्रदर्शनात भाग घ्यायची संधी दिली. तिथे येणाऱ्या किती तरी लोकांनी माझं काम पाहिलं. मी प्रात्यक्षिकं दाखवली तेव्हा काहीजणांनी माझ्याकडून एक दोन कलाकृती शिकून घेतल्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.’’

अभिरामच्या आई डॉ. प्रीती जोशी यांनी सांगितलं की, अभिराम १२ वर्षांचा असून आता सातवीत जाणार आहे. ही कला त्याने तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिली, तेव्हा तो लहान होता. मात्र इतक्‍या भराभर कागदाच्या घड्या बिनचूक घालायचा की आश्‍चर्य वाटायचं. नुसत्या चित्रफिती पाहून अनेक प्रकारच्या अवघड कलाकृती तो शिकला. कठिणातून आणखी कठिणाकडे जाण्याचं आव्हान घेत गेला. तो सध्या २०९ घड्यांनंतर साकार होणाऱ्या ड्रॅगनमध्ये गुंतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com