‘अरू’ स्टार्टअपकडून संरक्षणकर्त्याचे संरक्षण करणाऱ्या पोषाखाची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Special Dress
‘अरू’ स्टार्टअपकडून संरक्षणकर्त्याचे संरक्षण करणाऱ्या पोषाखाची निर्मिती

‘अरू’ स्टार्टअपकडून संरक्षणकर्त्याचे संरक्षण करणाऱ्या पोषाखाची निर्मिती

हाडे गोठविणारी थंडी, दुर्गम पर्वतीय भाग आणि तुरळक मनुष्यवस्ती असे वातावरण असलेल्या देशाच्या उत्तर व ईशान्येकडील सीमा भागात भारतीय जवान अहोरात्र संरक्षणासाठी सज्ज असतात.

Creation of protective clothing for army jawan from aroo startups pjp78

‘अरू’ स्टार्टअपकडून संरक्षणकर्त्याचे संरक्षण करणाऱ्या पोषाखाची निर्मिती

पुणे - हाडे गोठविणारी थंडी, दुर्गम पर्वतीय भाग आणि तुरळक मनुष्यवस्ती असे वातावरण असलेल्या देशाच्या उत्तर व ईशान्येकडील सीमा भागात भारतीय जवान अहोरात्र संरक्षणासाठी सज्ज असतात. अशा परिस्थितीत जवानांना केवळ संरक्षणात्मक उपकरणांचीच नाही तर, हिमवृष्टी आणि उणे तापमानात स्वतःचे रक्षण करण्यासाठी दर्जेदार साधन सामग्रींची आवश्‍यकता असते. यात गरम कपड्यांची सर्वाधिक गरज भासते. जवानांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी एक विशेष पोशाख बंगळूर येथील ‘अरू’ (AROO) या स्टार्टअपने तयार केला आहे. मुनीश हिंदुजा आणि रोहित बेदी यांनी पाच वर्षांपूर्वी या स्टार्टअपची सुरुवात केली होती. त्यांनी थंड हवामानापासून शरीराचा बचाव करणारी ‘ईसीडब्लूसीएस’ ही प्रणाली म्हणजेच पोशाख विकसीत केला आहे.

‘मेक इन इंडिया’पासून प्रेरणा घेऊन जवानांसाठी उपयुक्त असे उत्पादन तयार करण्याचे आम्ही ठरवले. उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही स्वदेशीवर भर दिला. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना योग्य संरक्षण पुरविणे हा आमचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार पोशाखाची निर्मिती करण्यात आली असून गुणवत्तेकडेही लक्ष देण्यात आले आहे.

- रोहित बेदी, सहसंस्थापक, अरू

पोशाखाची वैशिष्ट्ये

  • स्वदेशी पोशाख प्रणाली

  • उणे ३० अंश सेल्सिअस तापमानातही थंडीपासून बचाव

  • अत्याधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून तीन पदरी गणवेश

दृष्टीक्षेपात स्टार्टअप

  • पोशाख आणि हिमालयातील उपकरणे या विभागातील हे पहिले भारतीय संरक्षण स्टार्टअप

  • आतापर्यंत ६० हजारांहून अधिक पोशाख तयार

  • ‘अरू’चे पहिल्या ईसीडब्लूसीएस उत्पादनाची चाचणी २०१७ मध्ये