बारामती : क्रेडाई बारामतीच्या वतीने ‘मिशन रिग्रीन महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत नुकतेच उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. .बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, खजिनदार सुरेंद्र भोईटे, वनपाल एस. व्ही. बागल, क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष दत्तात्रेय बोराडे, उपाध्यक्ष राजेंद्र खराडे, सचिव भगवान चौधर, खजिनदार हरिभाऊ काळे, सहसचिव विजयकुमार चौंडकर, क्रेडाई महाराष्ट्राचे सहसंयोजक अमोल कावळे, वनरक्षक कृष्णा कारंडे, क्रेडाई महाराष्ट्राच्या सहसंयोजिका डॉ. स्मिता बोराडे, सहसंयोजिका मेनका कावळे आदी उपस्थित होते..पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना हरित वारसा देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत प्रफुल्ल तावरे यांनी यावेळी केले. अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक होत असल्याचे सुरेंद्र भोईटे म्हणाले..Pune Potato Loss : सातगाव पठारवर बटाटा लागवड ठप्प; पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले, बियाण्याचेही नुकसान.क्रेडाई बारामतीच्यावतीने किमान ६००० देशी झाडांची रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठरविलेले असून, त्यातील ६०० झाडांचे वृक्षारोपण केल्याची माहिती दत्तात्रेय बोराडे यांनी दिली..युथ विंगचे किरण पानसरे व अनंत तावरे, चंद्रकांत शिंगाडे, दीपक काटे, सिद्धार्थ जाचक, गणपत तावरे, राजेंद्र इंगोले, सुधीर शिंदे, अजित उलगडे, अमित देशमाने, अक्षय देवकाते, सुनील भोसले व महिला सदस्या उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.