
'चाँद निकला!', शुक्रवारीच साजरी होणार ईद
पुणे : गुरुवारी (ता.१३) चंद्रदर्शन (Eid-ul-Fitr 2021 Moon Sighting) झाल्याने उद्या शुक्रवारी (Friday) (ता.१४) रमझान ईद (Ramadan Eid) साजरी करण्याचा निर्णय हिलाल कमिटीने (चांद कमिटी) घेतला असल्याचे या कमिटीचे सरचिटणीस रफीऊद्दीन शेख यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपापल्या घरी नमाज पठण करावे, असेही आवाहन कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. (crescent moon is seen Ramadan Eid will be celebrated on Friday)
हिलाल कमिटी, मौलाना व ऊल्माए इकराम यांची गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले. या बैठकीला मौलाना गुलाम अहमद कादरी, मौलाना निजामुद्दीन फकरूद्दीन, अय्युब अशरफी, हाफीज इद्रिस, कारी इद्रिस, अतिक खान, सिराज बागवान, असिफ अय्युब शेख आदी उपस्थित होते. यावेळी चांद कमिटीच्या वतीने सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
हेही वाचा: जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं - रुपाली चाकणकर; पाहा व्हिडिओ
प्रेम, जिव्हाळा, त्याग, करुणा, सहवेदना, संयम, सहिष्णूता आदी मूल्यांची आठवण करून देणारा ईद हा सण आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोच उत्साह कायम ठेवून हा सण मुस्लिम बांधव साजरा करत आहेत. रजमान ईदच्या अनुषंगाने शासनाने 11 मे रोजी मागर्दर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्या सुचनांनुसार, नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मस्जिदमध्ये एकत्रित न येता घरातच सर्व कार्यक्रम साजरे करावेत. नमाज पठणासाठी मस्जिद किंवा मोकळ्या जागेत एकत्रित येऊ नये, सणाच्या निमित्ताने प्रशासनाने दिलेल्या सवलतीच्या वेळेत गर्दी करु नये, कोविड नियमांचे पालन करावे, कलम 144 लागू असल्याने व संचारबंदी आदेश असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर दुकाने थाटू नयेत व नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करु नये, स्थानिक पातळीवर लागू असलेल्या नियमांचे पालन करावे, रमजान ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याबाबत धर्मगुरु, स्वयंसेवी संस्था, राजकीय व सामाजिक नेते यांनी आवाहन करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
Web Title: Crescent Moon Is Seen Ramadan Eid Will Be Celebrated On Friday In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..