Murder Case : क्रिकेटमधील सट्टा बेतला तरुणाच्या जीवावर

सट्टा खेळण्यासाठी घेतलेले 28हजार परत न केल्याने तरुणाचा खून.
Murder
MurderSakal
Updated on
Summary

सट्टा खेळण्यासाठी घेतलेले 28हजार परत न केल्याने तरुणाचा खून.

पुणे - क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी घेतलेले 28 हजार रुपये परत न केल्याने तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32, रा. आईसाहेब बिल्डींग, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सराईत गुन्हेगार लहू माने (वय 40), विशाल अमराळे (वय 35) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निखिल याच्या 24 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी अमराळे, माने हे निखीलच्या ओळखीचे होते.

आरोपींनी निखिल यास क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी 28 हजार रुपये दिले होते. निखिलने त्यांचे पैसे परत न केल्यामुळे आरोपींच्या मनात त्याच्याविषयी राग होता. त्याच कारणावरुन सराईत गुन्हेगार माने याने निखिल यास धमकावण्यास सुरूवात केली. काही दिवसांपुर्वी आरोपींनी निखिलचे बिबवेवाडी भागातून अपहरण करुन त्यास डांबून ठेवले होते.

त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला. त्यावेळी त्यांनी माने व अमराळे या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा, त्यांनी खुन केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Harshad Hundaleker murder case latest news
Mahmad Khalif murder Nipani
Main accused in toxic liquor case arrested after a dramatic chase.
Daund Beheading Case: दौंडमध्ये ७० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करून खून; दोन संशयित अटकेत, शिराचा शोध सुरू
Marathi News Esakal
www.esakal.com