esakal | Video:क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

cricketer death on ground

मैदानावर खेळत असताना मृत्यू झाल्याचा अनेक घटना याआधी घडल्या आहेत. आता पुण्यात खेळाडूचा फलंदाजीवेळी मैदानावरच मृत्यू झाला आहे.

Video:क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपळवंडी - मैदानावर खेळत असताना मृत्यू झाल्याचा अनेक घटना याआधी घडल्या आहेत. आता पुण्यात खेळाडूचा फलंदाजीवेळी मैदानावरच मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तरुण फलंदाजीसाठी मैदानात उतरला असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं जमिनीवर कोसळला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील जाधववाडी येथे बुधवारी मयुर चषक जाधवाडी ही स्पर्धा सुरु होती. तेव्हा दुपारच्या सुमारास महेश उर्फ बाबु विठ्ठल नलावडे (वय-47,रा.धोलवड,ता.जुन्नर) फलंदाजीसाठी मैदानात खेळत होते. तेव्हा महेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

पंचांना विचारले किती चेंडू शिल्लक आणि...
बुधवारी दुपारी जाधववाडी ओझर व जांबुत या दोन संघाच्या दरम्यान क्रिकेटचा सामना सुरु होता. तेव्हा ओझर संघाचा खेळाडु बाबु हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पंचांना विचारलं की किती चेंडु शिल्लक आहेत. त्यानंतर शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना बाबुने समोरील फलंदाजास व्यवस्थित खेळ असे सांगितले. त्यानंतर अचानक बाबू जमिनीवर कोसळला. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दवाखान्यात नेण्याआधीच मृत्यू
मैदानावरच कोसळल्यानंतर बाबूला इतर खेळाडूंनी जवळच्या दवाखान्यात नेले.  मात्र दवाखान्यात नेण्यापुर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. जुन्नरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल सरदे यांनी शवविच्छेदन केले.  बाबू नलावडे यांचा मृत्यु हा हृदयविकाराने झाला असुन त्यांच्या शरीरात पुर्वी पेसमेकर बसवले असल्याची माहिती डॉक्टर सरदे यांनी दिली. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून टेनिस क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.

loading image