Pune Crime : 'या' 10 गँगस्टर्सनी पुण्यात माजवली होती दहशत | Gang war | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gang war

Pune Crime : 'या' 10 गँगस्टर्सनी पुण्यात माजवली होती दहशत

दोन दिवसांपूर्वी कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या दोन पोरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मिसरूड न फुटलेलं एक पोरगं कोयता घेऊन दुकानांची, गाड्याच्या काचांची तोडफोड करत आपली दहशत पसरवंत होतं. तोच दोन पोलिसांनी त्याला पकडलं अन् जिथे दहशत करण्याचा प्रयत्न कतृरत होता तिथेच चोपला. या घटनेच्या दोनच दिवसांनी परत एक बातमी येऊन धडकली. सिंहगड रोड परिसरातील खडकवासला येथे पुन्हा गुंडांनी गाड्याची तोडफोड केली. मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील वाढती गुन्हेगारी बघता पुण्याचा बिहार झालाय असं वाटायला लागलंय.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

पुण्यात पुन्हा कोयता गँग अॅक्टिव्ह झाल्यात. विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला अन् चर्चेत आली कोयता गँग. सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला तसा मोठा इतिहास आहे. जसा चांगला तसा वाईटही. बिहार आणि उत्तरप्रदेशातील मिर्झापूर, वासेपूरएवढे नाही पण इथेही एकापेक्षा वरचढ गँगस्टर्स आहेत. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाल्यानंतर रितेश कुमार नवे आयुक्त झाले पण पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल.

हेही वाचा: BJP MLA Laxman Jagtap Death : कट्टर समर्थक असतानाही पवारांशी 2 वेळा पंगा घेणारे जगताप

पुण्यातील कुप्रसिद्ध गँगस्टर्स

 • गजा मारणे गँग - मुळशी

  २०१४ मध्ये मुंबई पोलीसांनी गजानन मारणे याला अटक केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याला जामीन मंजूर झाला होता. जामीन मिळाल्यावर त्याने आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबई बंगळूर महामार्गावर मिरवणूक काढली होती. त्यानंतर खंडणीच्या आरोपावरून त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

 • निलेश घायवाळ गँग - कोथरूड

  गजा मारणे गँगशी निलेश घायवाळ गँगची चांगलीच दुश्मनी आहे.

 • शरद मोहोळ गँग - मुठा गाव

 • बाबा बोडके गँग - भोर,शनिवार पेठ

 • राकेश भरणे - थेरगाव

 • बाळ्या वाघिरे गँग - पिंपरी

 • पप्पू नायर - बिबवेवाडी

 • पिंट्या ढवळे गँग - अप्पर इंदिरा नगर

 • बंट्या पवार - सिंहगड रोड

 • विठ्ठल शेलार - मुळशी

एन्काऊंटर किंवा इतरांकडून हत्या करण्यात आलेले गँगस्टार

 • श्याम दाभाडे - तळेगाव (Encounter)

 • संदीप मोहोळ - हत्या झाली

 • आप्पा लोंढे - हत्या झाली

टॅग्स :Pune Newspolicecrime