नारायणगावमधील सहाय्यक पोलिस निरिक्षकाचा प्रताप; लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व न्यायालयात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पाच लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन केशव घोडे पाटील व पोलिस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत."एसीबी"चे पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच न्यायालयामध्ये लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी घोडे पाटील व हांडे यांनी तक्रारदाराकडे सात ऑगस्ट रोजी पाच लाख रूपयांची लाच मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला हा प्रकार अयोग्य वाटला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी "एसीबी"कडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन दोघाविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत. तर पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर पर्यवेक्षण अधिकारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com