शादी डॉट कॉमवरुन मुलींची केली फसवणूक; तोतया सरकारी नोकरदाराला अटक

विवाहित असून देखील शादी डॉट कॉमवर मुलींना रिक्वेस्ट टाकून सरकारी नोकरदार असल्याचे सांगून त्यांच्याशी मैत्री करून लग्नाचे आमिष देत आपल्या जाळ्यात ओढून जवळीक साधायचा.
फसवणूक
फसवणूकsakal
Updated on

बारामती : सरकारी नोकरी (Government Servant) आहे व अविवाहीत (Unmarried) असल्याची बतावणी करून शादी डॉट कॉम (Shaadi.com) वरील अनेक मुलींना भुरळ पाडून लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध प्रस्थापित करत फसवणूक करणा-या एकास बारामती तालुका पोलिसांनी भोर येथून अटक (Arrest) केली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अजयकुमार नंदकुमार चटौला (रा.रुई रुग्णालय शासकिय वसाहत बारामती) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे आहे. याबाबत मुंबई येथील एका 39 वर्षीय महिलेने लग्न संकेत स्थळावरून आरोपी अजयकुमार चटौला याने लग्नाचे आमिष दाखवत आपली पैशाची फसवणूक करून 21 डिसेंबर 2021 रोजी बलात्कार व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्याला गुरुवारी (ता. 6) अटक केली. त्याला न्यायालयाने 11 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फसवणूक
पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; सात टप्प्यांमध्ये होणार मतदान

आरोपी अजयकुमार चटौला हा बारामती येथील रुई शासकीय रुग्णालयात स्विपर म्हणून कार्यरत आहे. तो विवाहित असून देखील शादी डॉट कॉमवर मुलींना रिक्वेस्ट टाकून सरकारी नोकरदार असल्याचे सांगून त्यांच्याशी मैत्री करून लग्नाचे आमिष देत आपल्या जाळ्यात ओढून जवळीक साधायचा. त्यानंतर मुलींच्या घरच्यांना भेटून विश्वास संपादन करून मुलीला सोबत घेऊन फिरायला घेऊन जात होता. त्यानंतर मुलीशी शारीरिक सबंध प्रस्थापित करून पैशांची गरज असल्याचे सांगून पैसे लुबाड्त असल्याचा प्रकार बारामती तालुका पोलिसांनी तपासात समोर आणला आहे.

मुंबईच्या महिलेच्या फसवणुकी नंतर चटौला हा पुण्यातील दुसऱ्या मुलीसोबत भोर येथील एका रूमवर रहात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलिस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे,दत्तात्रय मदने,चालक तुषार लोंढे यांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sant Tukaram Maharaj Palkhi received a grand welcome at Uruli Kanchan as thousands of Warkaris continued their spiritual journey towards Pandharpur.
The Yogiraj Baba Maharaj Palkhi began its spiritual journey from Takli Bhima to Pandharpur amid devotional chants and the participation of thousands of Warkaris.
PMC deployed medical teams, ambulances and health booths to ensure uninterrupted healthcare services for Warkaris throughout the pilgrimage.
The stolen Bolero SUV and weapons were recovered as Pune Rural Police launched a search operation for the remaining suspects.
Marathi News Esakal
www.esakal.com