Pune Crime Branch : घरफोड्या, चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) युनिट तीनच्या पथकाने अटक केली.
Pune Crime Branch
Pune Crime Branchesakal

पुणे : घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय ३७, रा. दारूवाला पूल, सोमवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

त्याच्याविरुद्ध जबरी चोरी, घरफोडी आणि बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तो मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) पिस्तूल आणून गुंड टोळ्यांना विक्री करीत असल्याची माहिती युनिट तीनचे सहाय्यक पोलिस फौजदार सुनील पवार आणि संतोष क्षीरसागर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर सापळा रचून पकडले.

Pune Crime Branch
दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरवरच काळाचा घाला; 108 रुग्णवाहिकेची ट्रकला मागून जोरदार धडक

त्याच्याकडे देशी बनावटीच्या दोन पिस्तुलांसह चार काडतुसे आढळली. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सुनील पवार, संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, पांडुरंग कामतकर, किरण पवार, संजीव कळंबे, सुजीत पवार यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com