Pune Crime News : चाकण,महाळुंगे परिसरातली गुन्हेगारी धोकादायक ; गुन्हेगारीला चाप लावण्याची गरज

येथील औद्योगिक वसाहतीतील चाकण,महाळुंगे परिसरात गुन्हेगारी वेगाने फोफावत आहे. खून,अपहरण असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
Chakan Crime News
Chakan Crime Newssakal

चाकण : येथील औद्योगिक वसाहतीतील चाकण,महाळुंगे परिसरात गुन्हेगारी वेगाने फोफावत आहे. खून,अपहरण असे प्रकार सातत्याने घडत आहेत. महाळुंगे येथील रितेश पवार या तरुणाचा झालेला खून,गेल्या महिनाभरापूर्वी चाकण येथे झालेला अल्पवयीन मुलाचा खून,चाकणजवळील रासे फाट्या जवळील हॉटेल चालकावर नुकताच झालेला गोळीबार,काही महिन्यापूर्वी भोसेत झालेला तरुणावरील गोळीबार, महाळुंगे येथील खून प्रकरणातील बदला घेण्याच्या प्रकरणातून नुकतेच झालेले अठरा वर्षीय तरुणाचे महाळुंगे येथून झालेले अपहरण हे सगळे प्रकार पाहता चाकण,महाळुंगे परिसरात गुन्हेगारी वेगाने वाढते आहे व परिसरात अशांतता निर्माण होत आहे.

Chakan Crime News
Pune Temperature News : धूलिवंदनाला उच्चांकी तापमान ; पाऱ्याची सरासरी २.७ अंश सेल्सिअसने उसळी

काही गुंड, गुन्हेगार जामीनवर सुटलेले आहेत ते सराईतपणे अल्पवयीन मुलांच्या टोळ्या तयार करून दहशत माजवीत आहेत असेही वास्तव आहे. रासे फाट्यावरील हॉटेल चालकावर झालेला गोळीबार हा जे गुन्हेगार रेकॉर्ड वर आहेत जे गुन्हेगार तडीपार आहेत त्यांच्यामधील वादातून झालेला आहे. तडीपार लोक सराईतपणे कसे फिरतात, जामिनावर सुटलेले काही लोक अल्पवयीन मुलांच्या टोळ्या तयार करून गुन्हेगारी कशी फोफावतात हे भयानक वास्तव आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे, पोलिसांचे दुर्लक्ष होते का असाही सवाल नागरिक, कामगार, उद्योजकांचा आहे.

पोलिसांच्या तपास यंत्रणा वेगाने फिरत असतात, गुन्ह्यांचे तपास लावतात,पण गुन्हेगारी ही फक्त मलम पट्टी झाल्यासारखी रोखली जाते आणि पुन्हा वेगात पसरते असे चित्र आहे. पोलिसांचा गुन्हेगारी रोखण्यावर वचक राहिलेला आहे की नाही अशी शंका निर्माण होते आहे. काही पोलिसांच्या आर्थिक चिरीमुळे गुन्हेगारी फोफावत आहे असेही आरोप केले जात आहेत. काही गुन्हेगारांची गुन्ह्यांची कलमे पैसे घेऊन कमी केली जातात. काहींना सोडले ही जाते त्यामुळे काही गुन्हेगार मोकाट होतात असे ही भयानक वास्तव सांगितले जाते.

चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर तसेच महाळुंगे परिसर इझी मनी मिळविण्यासाठी गुन्हेगारांना महत्त्वाचा आहे. औद्योगिक वसाहतीचा परिसर हा गुन्हेगारांसाठी" इझी मनी " मिळविण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. बहुतेक गुन्हेगार खंडणी मागणे,हप्ता मागणे, ब्लॅकमेल करणे,काही लोकांवर दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी देणे त्यातून पैसा कमावणे. विविध कंपन्यात दादागिरी करणे त्यातूनही पैसा गोळा करणे.कंपन्यातील कामे, ठेकेदारी गुन्हेगारी करून मिळविणे त्यामुळे या परिसरात गुन्हेगारी फोफावते आहे.

त्याचबरोबर गावात टुकार मुलांची गुन्हेगारी बळावते आहे. पोलीस तडीपारी, मोका,कारवाया करतात त्या कारवायांना मर्यादा आहेत. चाकण, महाळुंगे परिसरात अगदी वर्दळीच्या ठिकाणी खून होतात हे गुन्हेगारीचं भयानक वास्तव आहे. ही गुन्हेगारी रोखणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनत आहेत हे अड्डे अगदी खेडेगावातल्या जनावरांचे गोठे ,काही डोंगरातील रिसॉर्ट, हॉटेल,भामा -आसखेड, चासकमान धरण परिसरातील काही रिसॉर्ट गुन्हेगारांचे निवांत अड्डे होत आहेत याकडेही पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. काही गुन्हेगारांना असलेला राजकीय नेत्यांचा, पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा वरदहस्तही भयानक आहे.

Chakan Crime News
Pune News : मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंहगड रस्त्यावर अपघात

गुन्हेगारांना सोडवण्यासाठी काही राजकीय नेते पोलीस अधिकाऱ्यांना,पोलिसांना फोन करून प्रयत्न करतात हे चित्र आहे.गुन्हेगार गुन्हे करतात आणि निवांत ठिकाण शोधतात ही निवांत ठिकाणे म्हणजे रिसॉर्ट, काही हॉटेल, जनावरांचे गोठे झाले आहेत. तेथे गुन्हेगार टोळक्याने बसतात. जेवणाच्या, दारूच्या पार्ट्या करतात. जुगार खेळतात. हे अड्डे शोधून त्या गुन्हेगारांना, अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांवर नियंत्रण आणणे याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. गुन्हेगारांच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीमुळे चाकण, महाळुंगे परिसरातील काही गावात अशांतता निर्माण झालेली आहे. किरकोळ वाद झाला तर काही गुन्हेगार अगदी खुनाच्या घटनेपर्यंत जातात. किरकोळ वादावर काही खून झालेले आहेत हे भयानक सत्य आहे.महाळुंगे गावात सातत्याने खुनाच्या घटना घडत असल्यामुळे गाव आर्थिक दृष्ट्या,औद्योगिक दृष्ट्या विकासाभिमुख असले तरी महाळुंगे गावातील काही प्रतिष्ठित मान्यवर लोक गावातील आलिशान बंगले सोडून पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरात राहण्यास गेलेली आहेत त्यामुळे गावातील अशांतता किती भयानक आहे हे याचे चित्र आहे.

गुन्हेगारी टोळ्या नुसत्या खून करून थांबत नाही तर काही टोळ्या, काही गुन्हेगार, अल्पवयीन मुले अंमली पदार्थांचाही यामध्ये विशेषतः गांजा चा व्यवसाय करतात त्याचे मोठया प्रमाणात सेवन करतात.त्यातून मोठ्या प्रमाणात लाखोंची विक्री, उलाढाल करतात. सराईत पणे गुन्हेगार तलवारी, कोयते, गावठी कट्टे, पिस्तूल बाळगतात.अल्पवयीन मुलेही नशा करतात नशेसाठी गांजा व इतर पदार्थांचा मद्याचा वापरही करतात. सोशल मीडियावर ते व्यस्त असतात सोशल मीडियावर धमक्या देणे, हातात कोयता घेऊन धमकावणे, काही रील करणे, डायलॉग चा ऑडिओ देणे असे प्रकार करत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी बेफाम सुरू आहे. चाकण येथे गेल्या महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलाचा खून अल्पवयीन मुलाने केला आणि खून करत असताना त्याचा व्हिडिओ इन्स्टा वर टाकला. त्यातून गुन्हेगारी किती भयानक आहे हे उघड होत आहे. याबाबत पोलिसांचा सायबर सेल नाही का?या सोशल मीडियाच्या वॉर कडे पोलिसांनी लक्ष देऊन संबंधित गुन्हेगारावर,अल्पवयीन मुलावर कारवाई केली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले की," चाकण परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. तडीपारी, मोक्का आदी कारवाया केल्या आहेत.पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुन्हेगारांच्या अड्डयाची पाहणी करून गुन्हेगारी टोळ्या अल्पवयीन मुलांच्या टोळ्या संपविण्याचाही पोलीस प्रयत्न करतील."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com