Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नातेवाईक आरोपी तात्काळ जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Abuse of minor girl Relative of accused in jailed Shikrapur pune

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नातेवाईक आरोपी तात्काळ जेरबंद

शिक्रापूर : शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका फार्महाऊसमधील शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका युवकाने बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना समजताच आरोपीला तात्काळ अटक करुन त्याचेवर बाललैंगीक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान तात्काळ तपास व आरोपी जेरबंद केल्याने शिक्रापूर पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हद्दीतील एका फार्महाऊस परिसरातील शेती करण्यासाठी एक शेतमजुर कुटुंब कामाला होते.

त्यांचेकडे त्यांच्याच नात्यातील एक युवक आला असता झोपडीत कुणी नसल्याचे पाहून त्याने शेतमजुर दांपत्याच्या बारावर्षीय मुलीला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. सदर बाब पिडीत मुलीने आपल्या पालकांना सांगितली असता त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे जावून रितसर तक्रार करताच शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ एक पथक पाठवून आरोपीस पकडून अटक केली व त्याचेवर बाललैंगीक आत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान आरोपी विशाल दामोदर गायकवाड (वय २१, रा.हळणी, ता.अहमदपूर, जि.लातूर) याला शिरुर न्यायलायाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

दरम्यान फार्महाऊस मालकांचा या घटनेशी कुठलाच संबंध नाही. बलात्कार व त्यातले त्यात बाललैंगीक आत्याचाराबद्दल शिक्रापूर पोलिस गंभीर असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षेपर्यंत शिक्रापूर पोलिस नेतील. घटनेबद्दलची फिर्याद येताच आरोपी तात्काळ जेरबंद केल्याने हद्दीतील अनेक संघटनांनी शिक्रापूर पोलिसांचे कौतुक व अभिनंदन केले. सदर घटनेचा आणि कुणाही राजकीय पक्ष, नेता वा अन्य कुणाचा संबंध नसल्याचा खुलासाही शिक्रापूर पोलिसांनी केला.

Web Title: Crime News Abuse Of Minor Girl Relative Of Accused In Jailed Shikrapur Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..