सिद्धू मुसेवालाची हत्या करणारे शूटर आंबेगाव, जुन्नरचे; परिसरात खळबळ

पंजाब चे गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील सराईत गुन्हेगार आंबेगाव जुन्नर चे. पोलीस यंत्रणेसह परिसरात खळबळ
crime news Ambegaon Junnar criminal in murder case of Punjab singer Sidhu Moose Wala
crime news Ambegaon Junnar criminal in murder case of Punjab singer Sidhu Moose Walasakal

मंचर : पंजाब येथील पसिद्ध गायक व कॉग्रेसचे युवा नेते सिदधू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची पंजाब राज्यातील मन्सा जिल्ह्यात जवाहरके गावात रविवारी (ता.२९) मे संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येतील कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रेणेसह परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष जाधव (वय २४, रा.पोखरी, ता.आंबेगाव) व सौरभ महाकाळ ( रा.मढ-पारगाव, ता.जुन्नर) ही त्याची मूळ गावे असून ते फरार आहेत. त्याची नावे गुन्हेगारी क्षेत्रात देश पातळीवर गेल्याने या भागात त्याच्याविषयी चर्चाना उधाण आले आहे. महाराष्ट्र, पंजाब व राजस्थान पोलिसांच्या रडारवर हे दोन गुन्हेगार आहेत.

भीमाशंकरजवळ आदिवासी डोंगरी भागात कोंढवळ येथे सुरुवातीला जाधवचे वास्तव्य होते. मंचर पोलीस ठाण्याच्या हदीत त्याने गुन्हेगारीला सुरवात केली. मंचर पोलीस ठाण्यात खून, पोस्को अल्पवयीन मुलीचे अपहरण, खंडणी व खुनी हल्ला आदि गुन्हे दाखल आहेत. तसेच मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून तो फरार आहे . त्याचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलय व मंचर पोलिसाचे पथक पंजाब राज्यात गेले होते. पण तेथे आरोपींनी पोलीसांना गुंगारा दिला. संतोष जाधव याचे वडील वारल्यानंतर उपजीविकेसाठी आई धुणीभांडी करण्यासाठी मंचरला ६ वर्ष पूर्वी आली. संतोष हा अल्पवयीन (वय १६) असतानाच त्याने कळंब (ता.आंबेगाव) येथील माजी सरपंच साळवे यांच्यावर खुनी हल्ला केला.

त्या वेळेस मंचर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली होती. कालांतराने त्याची जमिनीवर सुटका झाली. ता.२ जुलै २०२१ रोजी मंचर - एकलहरेजवळील फकीरवाडी येथे राण्या बाणखेले याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केली. या प्रकरणात पोलीस तपासात मुख्य सूत्रधार संतोष जाधव असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यापासून तो फरार आहे. जाधवला जेरबंद करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस नाईक राजेंद्र हिले, संजय नाडेकर यांचे पोलीस पथक ता.१७ मार्च २०२२ रोजी हरियाणा-पंजाब व राजस्थान येथे गेले होते. परंतु जाधवने पोलिसांना गुंगारा दिला. राजस्थान राज्यात श्रीगंगानगर जिल्हात झालेल्या गोळीबारात व बिष्णोई गुन्हेगारी टोळीत त्याचा सहभाग असल्याचे ही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महाकाळ व जाधव यांची मैत्री जमली असून ते संघटीत गुन्हेगारी करत आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दल या दोन्ही गुन्हेगारांच्या मागावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com