crime news brother killed brother mental distress baramati
 crime news brother killed brother mental distress baramatisakal

मानसिक त्रास देण्याच्या कारणावरून केला भावाने भावाचा खून

पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी तातडीने घटनेचे गांर्भीय विचारात घेत ओरोपीच्या मागावर पोलिस पथके रवाना केली

माळेगाव : येथे एका युवाने मानसिक त्रास देण्याच्या कारणावरून सख्या मावसभावाचा धारधार कात्रिच्या सहाय्याने आज निर्घुण खून केला. गजानन अनंतराव पवार (वय ३७, हल्ली मुक्काम रूई साईनगर, मुळ रा. हिंगोली) हे मयताचे नाव आहे. रुई येथील साईनगरमधील मयत गजानन यांच्या राहत्या घरी वरील दुर्दैवी घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषतः मयताचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर आपले वडील रक्ताच्या धारूराळ्यात पडल्याने त्याने आरडाओरडा केला. परिणामी परिसरातील लोक घटनास्थळी गोळा झाले. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत हा खून झाल्याचे ओळखले.

त्यानुसार पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी तातडीने घटनेचे गांर्भीय विचारात घेत ओरोपीच्या मागावर पोलिस पथके रवाना केली. घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी संतोष जगन्नाथ गुळगुळे (रा. हिंगोली) हा आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी संतोष हा खून करून हिंगोलीला पळून जाण्याच्या उद्देशाने कटफळ रेल्वे स्टेशनला गेल्याची माहिती मिळताच पोलिस तेथे पोचले व अचानकपणे झडप घालत आरोपीला ताब्यात घेतले. ही यशस्वी कामगिरी पोलिस हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे, मदने आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणी मयताची पत्नी ज्ञानेश्वरी पवार यांनी आरोपी संतोष याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली. 

आरोपी संतोष हा माझ्या पतीचा सख्खा मावसभाव आहे. यांचा एकत्रितरित्या  केसकत्रनालयाचा व्यवसाय होता. दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. संतोष यानेच माझ्या पतीचा खून केला आहे, अशी तक्रार ज्ञानेश्वरी पवार यांनी फिर्य़ादीमध्ये नमूद केली. उपलब्ध फिर्य़ाद आणि वैद्यकिय अहवालाच्या आधारे पोलिसांनी आरोपी संतोष गुळगुळे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस अधिकारी श्री. ढवाण पुढील तसाप करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com