मैत्रिणीच्या पतीसह दोघांकडून तरूणीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Rape of young girl by friend husband and two others threat of viral video on social media demand ransom
मैत्रिणीच्या पतीसह दोघांकडून तरूणीवर बलात्कार

मैत्रिणीच्या पतीसह दोघांकडून तरूणीवर बलात्कार

पुणे : पत्नीच्या मैत्रीणीसमवेत ओळख वाढवून पतीने तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर तिची छायाचित्रे व व्हिडीओ समाजामाध्यमांमध्ये प्रसारीत करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळले. त्याचबरोबर पतीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22), आशिष विजय कांबळे (वय 23, दोघेही रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ श्रीखंडे हा पिडीत तरुणीच्या मैत्रीणीचा पती आहे. त्याने समाजमाध्यमाद्वारे तरुणीला "तु मला खूप आवडते', अशा आशयाचा संदेश पाठविला होता. त्यानंतर त्याने फिर्यादीशी ओळख वाढवून तिला तो बाहेर फिरायला घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने आपल्या मोबाईलमध्ये तरुणीची छायाचित्रे व व्हिडीओ काढले होते. त्यानंतर त्याने संबंधित व्हिडीओ व छायाचित्रे समाजामध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडून 17 हजार रुपये उकळले होते. त्यानंतर सिद्धार्थचा मित्र आशिष यानेही तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. आशिषनेही तरुणीवर बलात्कार केला. त्याने तरुणीला मारहाण करुन पैशांची मागणी केली. दरम्यान, दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून व घाबरुन तिने पोलिसांकडे फिर्याद दिली.

Web Title: Crime News Rape Of Young Girl By Friend Husband And Two Others Threat Of Viral Video On Social Media Demand Ransom

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top