सासवडच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास अधिकारीच बदलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news update investigating officer of Saswad murder case changed police politics
सासवडच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास अधिकारीच बदलला

सासवडच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास अधिकारीच बदलला

सासवड : येथील भोंगळे वाईन्सलगतच्या कट्ट्यावर उन्हातून सुरक्षिता मिळावे म्हणून विश्रांतीसाठी बसलेल्या तीन कचरा वेचकांना., तेथेच अंडाभुर्जीची हातगाडी लावणाऱया तरुणाने दोनदा बांबुने मारहाण केली होती. तसेच गरम पाणीही त्यांच्या अंगावर टाकल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या दुहेरी हत्याकांडाच्या संदर्भाने आज पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सासवडला भेट देत तपासाची माहिती घेतली. दरम्यान, तपास अधिकारीच बदलण्याचा निर्णय काल रात्रीच घेतला.

ज्यांचे खून झाले, त्या कचरा वेचकांची अजूनही अोळख पटली नाही. दरम्यान, तिसरी कचरा वेचक महिला शेवंताबाई जाधव यांना देखील मारहाण झाल्याने व त्या जखमी असल्याने उपचार घेत आहेत. यातील अंडाभुर्जी हातगाडी चालक व आरोपी निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप (रा.ताथेवाडी, सासवड ता.पुरंदर) यास ता. 30 रोजी रात्री उशिरा पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी काल ता. 3 अखेर संपली. त्यामुळे पुन्हा न्यायालयात त्यास हजर केले असता, त्यास सोमवार ता. 6 पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी वाढविल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. आज पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सासवडला भेट देत तपासाची माहिती घेतली. याबाबत विचारले असता, पोलीस उप अधीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले की., या दुहेरी हत्याकांडाचे तपास अधिकारी अगोदर सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप होते. मात्र तपासात कुठल्याही त्रुटी राहु नयेत, तपास अधिक चांगला व्हावा म्हणून तपास अधिकारीच बदलण्याचा निर्णय काल रात्रीच जिल्हा अधीक्षकांनी घेतला. त्यामुळे यापुढे मी स्वतः (पोलीस उप अधीक्षक धनंजय पाटील) तपास अधिकारी राहणार आहे.

याबाबतची हकीकत अशी : सासवड येथील भोंगळे वाईन्सलगतच्या कट्ट्यावर बसलेल्या तीन कचरा वेचकांना., तेथेच अंडाभुर्जीची हातगाडी लावणाऱया तरुणाने दोनदा बांबुने मारहाण करीत उकळते पाणीही त्यांच्या अंगावर टाकले होते. त्यातून ता. 24 व ता. 30 मे रोजी अनुक्रमे 50 वर्षीय व 60 वर्षीय कचरा वेचकांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. अगोदर अकस्मित मृत्यू नोंद सासवड पोलीसांनी घेतली. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गेल्यानंतर हवेली पोलीस अधिक्षकांनी शोध घेत.. दुहेरी हत्याकांडाचा शोध लावला. तेंव्हा कुठे ता. 30 मे रोजी रात्री उशिरा दोन्ही खूनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. तसेच हातगाडीवाला निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप (रा.ताथेवाडी, सासवड ता.पुरंदर) याच्याविरुध्द खूनांचा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परीषद घेत.. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र दिले. त्यात पोलीस यंत्रणा व शवविच्छेदन करणारे डाॅक्टर दोषी असल्याचे आणि पुरंदरच्या आमदारांनी प्रकरण दडपल्याचा आरोप केला होता. हे आरोप आमदार संजय जगताप यांनी फेटाळून लावले होते. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक देशमुख यांनी सासवड येथे आज भेट देत फिर्याद, तपासाची कागदपत्रे पाहीली. तपास अधिकारी बदलला. त्यामुळे हे प्रकरण काय कलाटणी घेणार., याकडे साऱयांचे लक्ष आहे.

Web Title: Crime News Update Investigating Officer Of Saswad Murder Case Changed Police Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top