वाघोली - वाघोलीतील गुरुवार रात्रीच्या गोळीबार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात नेवु नये यासाठी दारू पिलेल्या दुसऱ्या मित्राने त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्वरमधून रुग्णवाहिका चालकाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या होत्या. तसेच रुग्णवाहिकेवर दगडफेक केली होती. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.