

Pune Burglary Gang Caught
Sakal
पुणे : दिवाळीच्या सुटीत बंद सदनिकांमध्ये घरफोडी करून ऐवज लुटणाऱ्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या सराईत चोरट्यांकडून पोलिसांनी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आठ घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी शिवम दत्ता अवचर (वय १९, रा. नऱ्हे, पुणे), नवनाथ ऊर्फ लखन बाळू मोहिते (वय २२, वैदुवाडी, हडपसर) या दोघांना अटक केली.