
Crime News : लष्कराच्या स्वयंपाकी पदाच्या परीक्षेत तोतया उमेदवार, दोघांना अटक
पुणे : लष्करात स्वयंपाकी (कुक) पदाच्या परीक्षेत एकाने तोतया उमेदवाराला परीक्षेस बसविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी राहुल महेंद्रसिंग राठी (वय ४२, रा. आळंदी रोड, दिघी कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दीपू कुमार (वय २३, रा. भारसर, फुलहत्ता, जि. सीतामढी, बिहार) आणि शैलेंद्र सिंग (वय २४, रा. धोनाई, सिरसागंज, जि. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.
लष्कराच्या धानोरी येथील केंद्रावर ग्रीफ बॉर्डर रोड संस्थेत स्वयंपाकी भरती प्रक्रियेअंतर्गत २८ मार्च रोजी लेखी परीक्षा होती. मूळ परीक्षार्थी शैलेंद्र सिंग याने परीक्षेत त्याच्याऐवजी दीपू कुमारला तोतया उमेदवार म्हणून बसवले. पर्यवेक्षक राहुल राठी यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दीपू कुमारची चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.