पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन पोलिस उपायुक्तांची चौकशी

उपायुक्तासह आत्तापर्यंत सात जणांची पुणे पोलिसांकडून चौकशी
crime update Inquiry Deputy Commissioner Police in phone tapping case pune
crime update Inquiry Deputy Commissioner Police in phone tapping case pune sakal

पुणे : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपींग करण्याच्या प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांनी तत्कालीन पोलिसांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, तत्कालीन पोलिस उपायुक्ताची सोमवारी दिवसभर पोलिस उपायुक्त कार्यालयामध्ये कसुन चौकशी करण्यात आली. तर आत्तापर्यंत उपायुक्तासह सहा ते सात पोलिस अधिकाऱ्यांची पुणे पोलिसांनी फोन टॅपींग प्रकरणी चौकशी केली आहे. दरम्यान, तत्कालीन पोलिस आयुक्तांचाही लवकरच जबाब नोंदविला जाण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चु कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांना टोपणनावे देऊन त्यांचे फोन टॅपींग केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात मागील महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार, संबंधित गुन्हा नोंद झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

दरम्यान, फोन टॅपींगचे प्रकरण हे पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या कालावधीत झाले आहे. त्यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी बोलाविले होते. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदविला. तर यापुर्वी तांत्रिक विश्‍लेषण विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व तेथे काम करणारे अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांनी केली. संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी नेमके कोणाच्या सांगण्यावरुन हि माहिती गोळा केली, या स्वरुपाची चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांचा जबाब नोंदिवण्यात आला आहे. तर तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांचा देखील या प्रकरणात लवकरच जबाब नोंदविला जाण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com