
परप्रांतीय तरुणाकडून कोयत्याच्या धाकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोणी काळभोर : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या आई व तिच्या १३ वर्षाच्या मुलीला एका परप्रांतीय नागरिकाने वो लडकी मुझे चाहिये उसके साथ मजा लेता हु असे म्हणत कोयता काढून पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. ०६) सकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती येथील रेल्वे ब्रिजवर घडला आहे. दिलीप राजू थापा (वय-२६, रा. रामदरा रोड, अंबरनाथ मंदिराजवळ, ता. हवेली मूळ रा. घाटगाव, ता. बिहरी, जि, सुरकेत, नेपाळ) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास मुलीची आई व मुलगी हि मॉर्निंग वॉकसाठी रामदरा रोडकडे घरातून गेल्या होत्या. घरी परत येताना कोळपेवस्तीवरील रेल्वे ब्रिजवर २२ ते २३ वर्ष वयोगटातील एक तरुण येताना दिसला. त्याने त्या दोघींना पाहिले असता हिंदी भाषेत वो लडकी बहोत नाजूक है, मुझको दे दो, मै उसके साथ मजा लेता हु असे म्हणू लागला. त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर घाबरून दोघेही त्या ठीकानावरून पळून जाऊ लागल्या. सदर व्यक्तीने या दोघींचा पाठलाग सुरु करून दोघींच्या पाठीमागे पळू लागला पळत असताना कंबरेला असलेला कोयता हातात घेऊन रुको रुको वो लडकी को मुझे दे दो, मै उसके साथ मजा लेता हु असे म्हणून पाठलाग करू लागला.
पुढे गेल्यावर एक चारचाकी पिकअप आल्याने त्याच्या जवळ तो जाऊन उभा राहिला. तसेच त्या ठिकाणी एक व्यक्ती आला व सदर व्यक्तीला त्याच्या दुचाकीवर बसवून निघून गेला. दोघींना वेळ मिळाल्याने एका घराच्या आडोशाला आसरा घेतला. सदर घडलेली हकीकत पतीस सांगितली. दरम्यान, मुलीचे वडील त्या ठिकाणी आले असता त्या व्यक्तीचा सदर परिसरात शोधाशोध सुरु केला. त्यावेळी गाडीवर आणलेल्या व्यक्तीने कोळपे वस्ती या ठिकाणी सदर व्यक्ती असल्याचे सांगितले. पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस त्या ठिकाणी आले व त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता वरीलप्रमाणे त्याने त्याचे नाव सांगितले. सदर व्यक्तीस पोलिसांनी कोयत्यासह ताब्यात घेतले आहे.
Web Title: Crime Update Young Girl Molest By Foreign Youth With Scythe Accused Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..