esakal | अन् अखेर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

पोलिस निरीक्षकांनी तक्रारदाराला मारहाण केल्यानंतर अखेर आठ महिन्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी घेतली तक्रार.

अन् अखेर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...

sakal_logo
By
रुपाली अवचरे

विश्रांतवाडी : येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी  "वरिष्ठांकडे वारंवार तक्रार का करतोस ?"या कारणावरून तक्रारदार महेश भानुदास गोळे (रा.दिघी) यांना पोलिस ठाण्यात मारहाण केली होती. मारहाणीचे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. मारहणीच्या प्रकरणाचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे पेंडींग आहे. या प्रकरणानंतर गोळे यांनी नोव्हेंबर २०१९ ला केलेल्या तक्रारीची दखल विश्रांतवाडी पोलिसांनी आठ महिन्यानंतर घेतली असून, गोळे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. 

गोळे यांचे कळस या ठिकाणी केकचे दुकान आहे. दुकान असणाऱ्या इमारतीमधील ड्रेनेजचे पाणी लिकेज होऊन गोळे यांच्या केकच्या दुकानासमोर येत होते. याबाबत गोळे यांनी नोव्हेंबर २०१९ ला आपले सरकार या ठिकाणी ऑनलाईन तक्रार केली होती. या तक्रारीचा पाठपुरावा विश्रांतवाडी पोलिसांकडे गोळे करत होते. दि. १० जुलै २०२० रोजी गोळे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा त्यांना "तू केस का वाढविले आहेस. गुन्हेगार आहेस का? वारंवार तक्रार अर्ज का करतोस?" यावरून गोळे यांना मारहाण केली होती. मारहाणीची ऑडीओ रेकॉर्डिंग गोळे यांनी केले आहे. त्यांनी मारहाणीची ऑनलाइन तक्रार केली आहे. या प्रकरणाबाबत दैनिक सकाळसह विविध वृत्तपत्रांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती.

या प्रकरणाचा सहायक पोलिस आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल सहायक पोलिस आयुक्तांकडून परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त यांचेकडे गेला आहे. त्यानंतर पोलिस उपायुक्त यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे अहवाल पाठविला आहे. या प्रकरणी निकाल पेडिंग आहे.

दरम्यान मूळ विषयासाठी गोळे यांनी नोव्हेंबर २०१९ ला केलेल्या तक्रारी अर्जाची विश्रांतवाडी पोलिसांनी दि.२९ जुलै २०२० ला घेतली आहे. त्यानी केलेल्या तक्रारीनुसार गैर अर्जदार यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून मूळ प्रकरण निकाली काढली आहे. मात्र गोळे यांना झालेल्या मारहाण झालेल्या प्रकरणावर वरिष्ठ काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

याबाबत महेश गोळे म्हणाले, आपण केलेल्या मूळ अर्जाबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्याकडून आठ महिन्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. मात्र आपल्याला झालेल्या मारहाणी प्रकरणाच्या केलेल्या तक्रारीवर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात त्या प्रतीक्षेत आपण आहोत. त्या प्रकरणातदेखील आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा गोळे यांनी व्यक्त केली आहे.

loading image