
मुंबई- पुण्यातून आंबेगाव तालुक्यात आलेल्या 268 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
घोडेगाव (पुणे) : लॉकडाउनच्या काळात मुंबई- पुण्यातून आंबेगाव तालुक्यात आलेल्या 268 जणांवर मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
आणखी लाॅकडाउनच्या भीतीने हिंजवडीत शेकडो मजूर रस्त्यावर
आंबेगाव तालुक्यात 100 पोलिसांच्या मदतीने 130 गावांत बंदोबस्त ठेवणे जिकिरीचे झाले होते. स्थानिक ग्रामसुरक्षा दल व पोलिस मित्रांच्या मदतीने हे काम गेले महिनाभर अव्याहतपणे सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
घोडेगाव पोलिस ठाण्यांतर्गत 56 पैकी 28 गावे आदिवासी दुर्गम भागात येतात. लॉकडाउननंतर भीमाशंकरमार्गे मुंबईहून येणाऱ्यांची संख्या वाढली होती. कडक बंदोबस्तामुळे यावर नियंत्रण ठेवण्यात आले. जीवनावश्यक वस्तू सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेदरम्यान देण्याची अंमलबजावणी करण्यात पोलिसांना यश आले. तसेच, देशी दारूअड्ड्यांवर छापे घालून पाच लाख 19 हजार रुपयांचा माल जप्त केला. 72 वाहने जप्त केली. 546 जणांकडून वाहन वाहतूक कायद्यांतर्गत एक लाख 94 हजार रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.