Pune Crime : गुंड गजानन मारणेला कोथरूड पोलिसांकडून अटक; गजा मारणेसह पाच जणांविरुद्ध मकोका कारवाई

कोथरूड परिसरात एका आयटी अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला पोलिसांनी सोमवारी (ता. २४) अटक केली.
Gund Gajanan Marne
Gund Gajanan Marnesakal
Updated on

पुणे - कोथरूड परिसरात एका आयटी अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला पोलिसांनी सोमवारी (ता. २४) अटक केली. पोलिसांकडून गजा मारणेसह पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

कोथरूडमधील आयटी अभियंता तरुण १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीवर घरी निघाला होता. भेलकेनगर परिसरात रस्त्यावर गर्दी होती. या गर्दीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना तिघांनी अभियंत्यास बेदम मारहाण केली होती. याबाबत अभियंता तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय-३५), किरण कोंडिबा पडवळ (वय-३१) अमोल विनायक तापकीर (वय-३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या तिघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी श्रीकांत संभाजी पवार पसार झाला आहे. तपासात आरोपी मारणे टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले.

या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का?’ या भाषेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी या तिघा आरोपींसह टोळीप्रमुख गजानन मारणे, त्याचा भाचा रूपेश मारणे याच्यावर मकोका कायद्यान्वये कारवाई केली. पोलिसांनी गजा मारणेला अटक केली असून, रूपेश मारणे याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

आरोपींची काढली धिंड

कोथरूड परिसरातील गजा मारणे टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत तिघा आरोपींची शास्त्रीनगर ते भेलकेनगर परिसरातून धिंड काढली. या आरोपींविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com