
राजेश कणसे
आळेफाटा : वडगाव आनंद या गावात दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अवघ्या ५ दिवसांत आवळल्या मुसक्या. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव आनंद (ता.जुन्नर) या ठिकाणी दि.५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चेतन रमेश चौगुले यांच्या घराचा अज्ञात चोरट्यांनी अनाधिकृतपणे खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५० हजार चोरी गेले होते तसेच त्यांचे जवळच राहणारे प्रशांत अनंतराव चौगुले यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरातील चांदीचे भांडी व रोख रक्कम असा एकुण २ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता असा दोन्ही घराचा मिळून एकुण ५ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याची फिर्याद चेतन चौगुले व प्रशांत चौगुले यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये नोंदविली होती.