पोलीस कर्मचाऱ्याची गुन्हेगारांनी पकडली कॉलर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

'फुकट इंडिका गाडी दिली नाही तर गोळ्या घालीन. गँरेज पेटवुन देईल.' अशी धमकी देणाऱ्या सलमान इनामदार याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याची गुन्हेगारांनी पकडली कॉलर

मंचर - 'फुकट इंडिका गाडी दिली नाही तर गोळ्या घालीन. गँरेज पेटवुन देईल.' अशी धमकी देणाऱ्या सलमान इनामदार (रा. फकिरवाडी-एकलहरे, ता. आंबेगाव) यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी बुधवारी (ता. २१) रात्री गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याच्या घरी गेलेले मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुदर्शन सुखदेव माताडे (वय २८) यांची कॉलर पकडली. झटापट केली. सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी इनामदार याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. २२) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी सरकारी पक्षा तर्फे माताडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंचर येथील प्रेम गँरेजचे मालक रेनकुमार नारेन्द्र प्रसाद कहार (वय ३७ रा एस.कॉर्नर काटेमळा मंचर ता आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात इनामदार यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.

त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी माताडे पोलीस गणवेशात फकीरवाडी-एकलहरे (ता. आंबेगाव) येथे आरोपी इनामदार याच्या घरी गेले होते. त्यावेळी इनामदार म्हणाला, 'तुम्हाला कोणत्या जहागीरदार साहेबानी मला पकडायला पाठविले आहे. त्याच्याकडे मी पहातो. तुम्ही माझे घरापर्यत आला. मी याचा बदला तुमच्या घरी येवुन घेईल' अशी धमकी देवून आरोपीने माझी यांची कॉलर पकडली, झटापट केली. त्यामध्ये सरकारी खाकी शर्ट गणवेशाची दोन बटने तुटुन पडली. असे माताडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत आहेत.

दरम्यान मंचर पोलीस ठाण्यात पूर्वी विरोधात फिर्याद दिल्यामुळे रागावून सलमान इनामदार व सोन्या बाणखेले (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) या आरोपीने मोबाईल व सुमो गाडीची बॅटरी असा एकूण बारा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला अशी फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात रेनकुमार नारेन्द्र प्रसाद कहार (रा.मंचर) यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

Web Title: Criminals Grabbed The Collar Of Policeman Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..