CCTV-CameraSakal
पुणे
Pune CCTV Camera : गुन्हेगारांना खुली सूट! पुण्यातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद
पुणे महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून शहरात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या कारणात्सव २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले. मात्र, यातील १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद पडले आहेत.
पुणे - पुणे महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून शहरात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या कारणात्सव २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले. मात्र, यातील १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद पडले आहेत. हे सीसीटीव्ही महापालिकेने बसविलेले असले तरी त्याचे नियंत्रण पोलिसांकडे आहे. त्यामुळे या निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च करणार कोण याबाबत स्पष्टता नसल्याने ते बंदच आहेत.