गुन्हेगारांवर घरापासूनच "लक्ष' 

गुन्हेगारांवर घरापासूनच "लक्ष' 

पिंपरी -  पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे. तसेच पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या घरोघरी जाऊन तपास सुरू केल्यामुळे पोलिसांचा वचकही वाढला आहे. 

शहरात पूर्वी गुन्हे शाखेची केवळ दोनच कार्यालये होती, तर एकच पोलिस उपायुक्‍त होते. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नव्हती. पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी गुन्हे शाखेची वेगवेगळी कार्यालये सुरू केली. त्याचा उपयोग सराईत गुन्हेगारांवरील पोलिसांचा वॉच वाढविण्यासाठी झाला. 

पद्मनाभन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी आटोक्‍यात आण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली. प्रथम त्यांनी चौकीत बसून राहणाऱ्या पोलिसांना चौकात आणले. ठिकठिकाणी पोलिस दृष्य स्वरूपात दिसू लागल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. बिनधास्त हत्यारे घेऊन फिरणाऱ्यांना चाप बसला. सर्व पोलिस ठाण्यांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली. यादीनुसार सराईत गुन्हेगारांवर तडीपार आणि एमपीडीएच्या कारवाया सुरू केल्या. त्यामुळे सराईत गुन्हेगारांची पळापळ सुरू झाली. 

दोन किंवा त्यापेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांच्या घरी रात्रपाळीतील अधिकारी जाऊन तपासणी करू लागले. गुन्हेगार सध्या काय काम करतो, पैसे कोठून आणतो, त्याचे मित्र कोण, याची माहिती त्या सराईतांकडून किंवा त्याच्या घरच्यांकडून घेऊ लागले. आपल्यामुळे कुटुंबाला त्रास होत असल्याने काही जणांनी शहरातूनच काढता पाय घेतला. गुन्हे उघडकीस आणण्याची स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखांमध्ये जणू स्पर्धाच सुरू असल्याचे पाहायला मिळते. 

गुन्हे शाखेला कर्मचारी दिले आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कामाला सुरवातही झाली आहे. निनावी तक्रारींची दखल घेऊन त्याची खातरजमा करून सराईतांवर कारवाई केली जाते. गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याने आगामी काळात त्यांच्या गुन्हेगारी कारवाया पूर्ण नियंत्रणात येतील. 
सतीश पाटील, सहायक आयुक्‍त, गुन्हे शाखा 

गुन्हे शाखा कर्मचारी 
युनिट एक 24 
युनिट दोन 18 
खंडणी, दरोडाविरोधी पथक 24 
आर्थिक गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक 16 
सायबर सेल 4 

पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकातील कर्मचारी 
हिंजवडी 8 
वाकड 15 
सांगवी 16 
भोसरी 8 
एमआयडीसी भोसरी 8 
पिंपरी 14 
चिंचवड 11 
निगडी 12 
दिघी 8

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com