

-rat२१p६.jpg
58663
मगरीच्या हल्ल्यातून वाचलेल्या नंदिनी पवार.
- rat२१p५.jpg
58661
बिबट्याशी संघर्षात जखमी प्रतिभा दळवी.
मगरीच्या तावडीतून
आईला मुलीने वाचविले
रत्नागिरी जिल्ह्यातील थरारक घटना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण (जि. रत्नागिरी), ता. २१ : तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर गुरुवारी (ता. २०) सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला केला. घाबरलेल्या महिलेने काठावरील दगड घट्ट धरून ठेवला होता. त्याचवेळी त्या महिलेसोबत असलेल्या तिच्या १० वर्षांच्या मुलीने धाडस दाखवले आणि आईला मगरीच्या जबड्यातून सुरक्षित बाहेर आणले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी भूपेंद्र पवार (वय ३५) या काल सायंकाळी सहाच्या सुमारास आपली मुलगी स्वर्णी हिच्यासोबत घरामागील वाशिष्ठी नदी घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्यावर झडप घातली आणि पाय जबड्यात पकडत त्यांना खोल पाण्याकडे ओढण्यास सुरुवात केली. या हल्ल्याने घाबरलेल्या नंदिनी यांनी आरडाओरड करत काठावरील मोठा दगड पकडला. आईला मगर पाण्यात ओढत असल्याचे लक्षात येताच स्वर्णीने घाबरून न जाता तातडीने आईच्या मदतीला धावली. तिने आईचा हात घट्ट पकडून आपल्या परीने सर्व ताकद लावत तिला पाण्याबाहेर खेचले. या स्वर्णीने प्रसंगावधान राखत केलेल्या धाडसामुळे नंदिनी यांचा जीव वाचला.
------------
बिबट्याशी वृद्धेचा संघर्ष
देवरूख (जि. रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने घरात घुसून कोंबड्यांवर हल्ला केला; मात्र त्याचवेळी घरात अचानक समोर आलेल्या बिबट्याशी प्रतिभा प्रकाश दळवी (वय ६०) यांनी तब्बल अर्धा तास जिवाची पर्वा न करता संघर्ष केला. त्यांच्या अफाट धाडसामुळे अखेर बिबट्याने घराबाहेर पडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली; मात्र, या झटापटीत प्रतिभा दळवी गंभीर जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी पहाटे सुमारे चारच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.