

नारायणगाव, ता. ७ : प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ अंतर्गत राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जुन्नर तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी केले.
राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘पीक स्पर्धा नोंदणी’ टॅबवर अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जाची मुदत व पात्रता :
मूग व उडीद पिकासाठी १० जुलै २०२६ ही मुदत असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करता येतील. स्पर्धकाकडे स्वतःच्या नावे जमीन असणे अनिवार्य असून, भात पिकासाठी किमान २० गुंठे तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क चलन, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) आणि बँक पासबुकची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
बक्षिसांचे स्वरूप :
ही स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य अशा तीन स्तरांवर होईल. तालुका पातळीवर ५ हजार, जिल्हा पातळीवर १० हजार, तर राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. द्वितीय व तृतीय क्रमांकांसाठीही बक्षिसे असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.