भात रोपांच्या उगवणीसाठी मुळशीकरांचे डोळे आभाळाकडे

भात रोपांच्या उगवणीसाठी 
मुळशीकरांचे डोळे आभाळाकडे
Published on: 

कोळवण, ता. २६ : मुळशी तालुक्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रातही पावसाने ओढ दिल्याने भात शेती संकटात सापडली आहे. मंगळवारी झालेल्या अल्प पावसानंतर कडक ऊन पडल्याने पेरलेले बियाणे करपण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.
तालुक्यात पावसाअभावी धुळवाफेवरील भात बियाण्यांची उगवण रखडली आहे. कडक उन्हामुळे शेतातील बियाणे तापून त्याची उगवण क्षमता संपण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे पक्षी बियाणे वेचून खात असल्याने नुकसान होत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दोन दिवसांत पाऊस न झाल्यास बियाणे ''पिठाळणार'' असून पुन्हा पेरणी करावी लागेल. मात्र, बाजारपेठेत आणि घरातही बियाणे शिल्लक नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे.
सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ६-७ वेळा पाणी देऊन रोपे जगवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता नद्यांचे पाणी आटल्याने ती रोपेही धोक्यात आली आहेत. पाणी नसल्याने रोपांची मुळे जमिनीत खोलवर गुंतली असून, पुनर्लागवडीवेळी ती तुटण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Manoj Jarange demand for blanket farmer loan waiver
Drought in Maharashtra solapur latur
Sugarcane crushing season
Fertilizer Allocation System
Marathi News Esakal
www.esakal.com